<no title>

*विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता व श्रवणभक्ती असली पाहिजे* 
                      *प्रा.डॉ. रघुनाथ केंगार*


*कडेगांव दि.29(प्रतिनिधी)* वाचनाने मानव ज्ञानवंत प्रज्ञावंत बनतो आणि आपणास इच्छित स्थळापर्यंत पोहोचता येते, म्हणून आजच्या विद्यार्थ्यांनी चांगली चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. जो विद्यार्थी चांगले चांगले ऐकतो तोच विद्यार्थी उत्तम प्रकारे बोलू शकतो म्हणून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता आणि श्रवणभक्ती असली पाहिजे असे प्रतिपादन प्रा.डॉ. रघुनाथ केंगार यांनी केले.
                  ते आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कडेपूर येथे अग्रणी महाविद्यालय अंतर्गत मराठी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी "भाषिक कौशल्य व व्यक्तिमत्व विकास"  या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. टी. शिंगटे हे होते. प्रारंभी अग्रणी महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. बापूराव पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात या कार्यशाळेचा हेतू स्पष्ट करुन सांगितला. याप्रसंगी प्रा. डॉ. कृष्णा भवारी, प्रा. डी. व्ही.भाट व  प्रा. संतोष काळे प्रमुख उपस्थित होते.                     
                   वाचण्यासारखा आणि पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही, पण आज मोबाईल मुळे 50% मुलांचे वाचन आणि लेखन कमी झाले आहे. अशी खंत व्यक्त करून डॉ. रघुनाथ केंगार पुढे म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांना  भूमितीच्या विविध कोनापेक्षा जीवनामध्ये उपयोगी पडणारा दृष्टिकोन शिकवला पाहिजे. जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर भाषिक कौशल्या बरोबरच आपली देहबोली महत्त्वाची आहे असेही ते शेवटी म्हणाले.
              यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.एस.टी. शिंगटे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या अंगी जिद्द व चिकाटी असली पाहिजे. जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर श्रवण वाचन भाषण संभाषण ही भाषिक कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात केली पाहिजेत‌. आपली क्षमता ओळखून आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने आत्मविश्वासाने परिश्रम केले तरच तुम्ही स्पर्धेच्या युगात यशस्वी व्हाल असेही प्राचार्य शेवटी म्हणाले. 
                   प्रारंभी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन करुन  संस्थेच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  सुरुवातीस प्रमुख मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य व  अग्रणी महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. बापूराव पवार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. सौ. विजया पवार यांनी करून दिला. या कार्यशाळेस वाळवा, इस्लामपूर, कडेगांव,  आष्टा, रामानंदनगर, पलूस या महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कुमार इंगळे यांनी तर शेवटी आभार प्रदर्शन प्रा. सौ. ए.ए.हावळे मॅडम यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रा. राजेंद्र महानवर, प्रा. सुनिल खोत, डॉ. सतीश व्यवहारे,  प्रा. सुरज डुरेपाटील, कृष्णांत सपताळ सर, परिचर सचिन माने, किरण भोंगाळे यांनी परिश्रम घेतले.


Popular posts
पांडोझरी येथे गरजू १०० कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप* (संख प्रतिनिधी-  मिलींद टोणे )
Image
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आज जत येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी ...
Image
बसवराज पाटील यांच्याकडून 500 जिवनावंश्यक किट व 5000 मास्क वाटप (संख प्रतीनिधी -- राजेभक्षर जमादार )
Image
कुणिकोणुर येथील सर्व गावकरी कुटुंबाना भाजीपाल्याचे वाटप*     अध्यात्माच्या माध्यमातुन समाजकार्य करणारे ह. भ. प. तुकारामबाबा महाराज* येळवी प्रतिनिधी (संजय चव्हाण)
Image
बंजारा समाजातील गोरगरीब मजुरांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप ... वसंतराव नाईक अधिकारी व कर्मचारी संघटना सांगली जिल्हा यांचा स्तुत्य उपक्रम .
Image