बंजारा समाजातील मजुरांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप ... वसंतराव नाईक कर्मचारी संघटना सांगली जिल्हा यांचा स्तुत्य उपक्रम ...

बंजारा समाजातील मजुरांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप ...
वसंतराव नाईक कर्मचारी संघटना सांगली जिल्हा यांचा स्तुत्य उपक्रम ...


वसंतराव नाईक कर्मचारी संघटना सांगली याने समाजातील गोरगरिबांना दिला मायेची आधार ...


सांगली प्रतिनिधी :(जत दर्शन)
    जगामध्ये कोरोना व्हायरस या भयानक महामारीपुढे सर्व देशात फार वाईट स्थिती निर्माण झाली असताना महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज ऊसतोड व रस्त्याची कामे करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात आलेला आहे. या समाजातील सर्व मजुरांचे जीवन हे दररोजच्या कष्टावर अवलंबून असते. दररोज काम केले की त्यांना दोन वेळेची  रोजीरोटी  खायला मिळते .या दररोज कष्टातून कमवलेल्या या पैशातून ते दोनवेळचे  उदरनिर्वाह व आपल्या गावाकडील मुलांचा शिक्षणाचा खर्च यातून करत असतात. पण आज या कोरोणासारख्या महामारीमुळे सर्व मजुरांचे भयानक हाल होताना दिसत आहेत. त्यांना स्थानिक पातळीवर कोणतीही मदत मिळत नाही . दोन वेळच्या अन्नाला हे मजूर महाग झालेली दिसून येतात. या सर्व गोष्टी निदर्शनास आल्यानंतर वसंतराव नाईक कर्मचारी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष प्रा. सचिन चव्हाण व जिल्हा सल्लागार सखाराम राठोड यांनी पुढाकार घेऊन संघटनेतील लोकांना आव्हान केले. संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी या आव्हानाला चांगला प्रतिसाद देऊन सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्द येथे मोलमजुरी करणाऱ्या वीस कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले . या सामाजिक उपक्रमांमध्ये वसंतराव नाईक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री रंगनाथ चव्हाण यांनीही मोलाची अशी मदत केली. वसंतराव संघटनेचे जिल्हा सल्लागार दानशूर व्यक्तिमत्व सखाराम राठोड यांनी मोठ्या प्रमाणामध्ये स्वतः वैयक्तिक एक महिना पुरेल एवढे धान्य धान्य या गरजू लोकांना दिले. वसंतराव नाईक संघटना सांगली जिल्हा यांचे हे सामाजिक काम पाहून सर्व स्तरातून कौतुक होत आहे या सामाजिक उपक्रमांमध्ये जत दर्शनचे संपादक व संघटनेचे पदाधिकारी सुरेश राठोड त्याचबरोबर दिलीप राठोड अशा अनेक पदाधिकारी व समाजातील अनेक व्यक्तीने या सामाजिक उपक्रमासाठी खारीचा वाटा उचलला.


Popular posts
बंजारा समाजातील गोरगरीब मजुरांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप ... वसंतराव नाईक अधिकारी व कर्मचारी संघटना सांगली जिल्हा यांचा स्तुत्य उपक्रम .
Image
गुगवडमध्ये गरजून जीवनावश्यक  वस्तूचे वाटप*  माजी सरपंच शमशुद्दीन किरणगी यांचा उपक्रम
Image
कोरोना विरुद्धच्या लढाईत सहकार्य करा..  कुणिकोणुर गावचे सरपंच लक्ष्मण पाटील व उपसरपंच शशिकांत चव्हाण यांचे ग्रामस्थांना आवाहन
Image
कोरोना विरुद्धच्या लढाईत सहकार्य करा..  कुणिकोणुर गावचे सरपंच लक्ष्मण पाटील व उपसरपंच शशिकांत चव्हाण यांचे ग्रामस्थांना आवाहन
Image
जत तालुक्यातील पंधरा हजार कुटुंबीयांना भाजीपाला पुरवणार - तुकाराम (बाबा) महाराज* 
Image