<no title>सांगली जिल्ह्यात मांडुळ, कासव, घुबड तस्करांचा धुमाकूळ

*सांगली जिल्ह्यात मांडुळ, कासव, घुबड तस्करांचा धुमाकूळ*



संख :प्रतिनिधी   मिलींद टोणे 


पैशाचा  पाऊस पाडण्यासाठी, लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी, गुप्तधनाचा शोध घेण्याच्या अंधश्रद्धेपोटी व गैरसमजूत यातून मांडुळ, कासव व घुबडांची तस्करी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र अंधश्रद्धेपोटी या हजारो निष्पाप प्राण्यांचा हकनाक बळी जात आहे. दरम्यान, तस्करीचे प्रमाण वाढल्याने या प्राण्यांसाठी आता अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. संबंधित विभागाने याबाबत कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे. 


मुंबई, पुणे, नाशिक शहरातून तसेच कर्नाटक, उत्तर प्रदेश व बिहार राज्यातील बडे तस्कर शहरातील लॉजमध्ये तळ ठोकून असल्याची चर्चा आहे. त्याठिकाणी  बसून ते अगदी गल्लीतील व्यवहार दिल्लीपर्यंत क्षणात नेतात. गावोगावी सुशिक्षित बेकार    तरुणांना मोठ-मोठ्या रकमेचे आमिष दाखवून त्यांची मोठी साखळी तयार केली आहे. 



एखाद्या  ठिकाणी मांडुळ, कासव अथवा घुबड पकडल्याची माहिती मिळताच हे तस्कर घटनास्थळी जावून त्याची चाचणी घेतात. मांडुळ उन्हात धरल्यानंतर त्याची सावली पडत नाही. आरशासमोर धरल्यानंतर त्याचे  प्रतिबिंब आरशात दिसत नाही. किंवा विद्युत प्रवाह  आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी चक्क टेस्टर लावला जातो. यातील दिवा लागल्यास हे तंत्र विधीसाठी योग्य असल्याचे सांगण्यात येते. मात्र आजपर्यंत विद्युत प्रवाह वाहत असलेला मांडुळ एकाही व्यक्तीने बघितलेला नाही.


दरम्यान, अनेक वेळा पकडलेल्या प्राण्यांत ते काहीतरी कमतरता काढतात आणि ही वस्तू त्या योग्यतेची नाही असे सांगतात. पाहणी  करण्याच्या  नादात अनेकवेळा प्राणी जखमी होऊन मरण पावतात. तर काहीवेळेला वस्तू योग्य असल्याचे सांगण्यात येते, पण दराच्या तडजोडीत व्यवहार मोडला जातो. त्यामुळे हा निव्वळ बनवाबनवीचा उद्योग करून दलाल पैसे मिळऊन सुरक्षित लोकांना मात्र हातोहात मुर्ख बनवत आहेत.
*किंमत ठरवल कशी*
काही दिवसांपूर्वी 
जत तालुक्यातील तिकोंडी येथे एका पिशवीतून मांडुळ विक्रीसाठी घेऊन जाताना एकाला अटक करण्यात आली. विट्यातही एकला मांडुळ प्ररकरणी अटक करण्यात आली. त्यांची किंमत दहा लाख रुपये सांगण्यात आली. मात्र ग्रामीण भागात शेतीमध्ये कोठेही आढळणाऱ्या या मंडळींची खरंच ईतकी किंमात आहे का, आणि जर आसेल तर ती कशाचा आधार घेऊन ठरवली जाते,  असे प्रश्न आहेत. 


*मांडुळ म्हणजे काय*


 मांडुळ हि गांडुळाच्या प्रवर्गातील पण आकाराने मोठी असलेली सापाची जात आहे. हेड सेड बोआ, या इंग्रजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या सापाची आपल्या भागात मांडू अथवा दुतोंड्या आशी ओळख आहे. माऊ मातीमध्ये हा साप स्वतःला काढून घेतो. दिसायला अजगरा सारखा असतो .पिवळसर , काळसर,तपकिरी, व ताबुस रंगाचा आसतो.  तोंडाचा आणि सेफ्टीचा आकार जवळपास सारखाच असतो. त्यामुळे नेमके तोंड व चपटे कुणीकडे आहे हे लगेच लक्षात  येत नाही. प्रामुख्याने  सरडे, पक्षी,घुषी व आन्यअस्तित्वावर गदा आली आहे.दरम्यान ,कासवावर विशिष्ट तंत्रविद्या करून पैशाचा पाऊस पाडता येतो घरात कासव ठेवल्याने संपत्तीत वाढ होते .असे तस्कर संबंधित लोक सांगत त्यासाठी कासवाला 18 किंवा 21 नक्की आणि किमान 5 किलोपेक्षा अधिक वजन हवे असल्याचे सांगण्यात येते. मात्र ही एक केवळ अंधश्रद्धा आहे .खरेतर असा पैशाचा पाऊस पडत असता तर कासव मांडूळ व घुबडाची देवाण-घेवाण करणारे लोक आज करोडपती झाले असते.
घुबड या पक्षालाही अंधश्रद्धेने घेरल्याने घुबड संकटात सापडले आहे. भारतात घुबडाच्या 32 प्रजाती आहेत. त्यापैकी स्पाटिड ओवलेट (पिगळा),ब्राउन फिश,राक ईगल,डस्की ईगल (हुमा घुबड)  अशा 13 प्रजातीची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते. घुबडाला पकडून त्याला ठार मारले जाते आणि त्याचे डोके पाय पंख काढून जादूटोणा कशासाठी वापरतात  अशी चर्चा आहे.
*विशेष मोहिमेची गरज*


कित्येक वर्षापासून अंधश्रद्धेपोटी अनेक प्राण्यांचा बळी गेला आहे .आणि आजही जात आहे कधीतरी खबर यामार्फत माहिती मिळाल्यानंतर तस्करा वर कारवाई करण्यात येते .अशी लुटूपुटू कारवाई करून तस्कर यावर वचक बसणार नाही .प्राण्यांचा जीव वाचण्यासाठी पोलिसांनी वन विभागाने संयुक्त मोहीम राबवून तस्करांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.


*अंधश्रद्धेत राजकीय नेतेही गुंतले....*
सुशिक्षित समाज व्यवस्थेमध्ये विज्ञानाच्या बाता मारणारे काही राजकीय नेते मंडळी सुद्धा या अंधश्रद्धेला बळी पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे कासव मांडूळ या प्राण्यांना पकडण्यासाठी व त्यांच्यावर तंत्रविद्या करण्यासाठी नेतेमंडळीही काही खास माणसांची नेमणूक केली आहे अशी चर्चा जिल्ह्यात जोरदार सुरू आहे
*टूव्हीलर ,डबल इंजन ,फोर व्हीलर, कोडवर भाषा*


कासव ,मांडूळ तस्कर एकमेकाशी फोनवरून बोलताना विशिष्ट कोड भाषेचा वापर करतात .मांडवाला टुविलर डबल इंजन असे नाव देण्यात आले आहे कासवाला फोर व्हीलर म्हटले जाते .तर त्याच्या नकाला बटन म्हणतात .अठरा किंवा 21 नखे असलेल्या कासवाला म्हणजेच फोर व्हीलरला भरपूर मागणी आहे आसे म्हणतात.


Popular posts
पांडोझरी येथे गरजू १०० कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप* (संख प्रतिनिधी-  मिलींद टोणे )
Image
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आज जत येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी ...
Image
बसवराज पाटील यांच्याकडून 500 जिवनावंश्यक किट व 5000 मास्क वाटप (संख प्रतीनिधी -- राजेभक्षर जमादार )
Image
कुणिकोणुर येथील सर्व गावकरी कुटुंबाना भाजीपाल्याचे वाटप*     अध्यात्माच्या माध्यमातुन समाजकार्य करणारे ह. भ. प. तुकारामबाबा महाराज* येळवी प्रतिनिधी (संजय चव्हाण)
Image
बंजारा समाजातील गोरगरीब मजुरांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप ... वसंतराव नाईक अधिकारी व कर्मचारी संघटना सांगली जिल्हा यांचा स्तुत्य उपक्रम .
Image