<no title>

वाळवा प्रतिनिधी:
 ज्ञानसिद्धी स्कॉलर अकॅडमीमध्ये कोरोना बाबत मार्गदर्शन शिबीर संपन्न...
       डीजी राठोड फाऊंडेशन संचलित ज्ञानसिद्धी स्कॉलर अकॅडमी व नवोदय , स्कॉलरशिप स्टडी सेंटर  नवेखेड तालुका वाळवा या शैक्षणिक संकुलामध्ये कोरोना व्हायरस याविषयी मार्गदर्शन वर्ग ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉक्टर माणिक हिरवे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना  कोरोना व्हायरस या संदर्भामध्ये कशा पद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे .त्या संदर्भामध्ये स्वच्छतेचे नियम सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नाचे शंकानिरसन केले. कोरोनाबरोबर इतर सर्व आजाराबाबतीमध्ये आरोग्याची कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. सुरेश राठोड सर , सचिव संजय चव्हाण सर ...मार्गदर्शक शिक्षक गजानन कुलाळ सर , अक्षय कोकरे सर , स्वाती सावंत मॅडम.. शिक्षकेतर कर्मचारी सुनील राठोड विशाल हुबाले व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांची ओळख व आभार श्री राठोड सर यांनी मानले . सूत्रसंचालन ओमप्रसाद कबाडे या विद्यार्थ्याने केले..


Popular posts
पांडोझरी येथे गरजू १०० कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप* (संख प्रतिनिधी-  मिलींद टोणे )
Image
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आज जत येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी ...
Image
बसवराज पाटील यांच्याकडून 500 जिवनावंश्यक किट व 5000 मास्क वाटप (संख प्रतीनिधी -- राजेभक्षर जमादार )
Image
कुणिकोणुर येथील सर्व गावकरी कुटुंबाना भाजीपाल्याचे वाटप*     अध्यात्माच्या माध्यमातुन समाजकार्य करणारे ह. भ. प. तुकारामबाबा महाराज* येळवी प्रतिनिधी (संजय चव्हाण)
Image
बंजारा समाजातील गोरगरीब मजुरांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप ... वसंतराव नाईक अधिकारी व कर्मचारी संघटना सांगली जिल्हा यांचा स्तुत्य उपक्रम .
Image