संख प्रतीनिधी -- राजेभक्षर जमादार बाबरवस्ती पांडोझरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

संख प्रतीनिधी -- राजेभक्षर जमादार


बाबरवस्ती पांडोझरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा  येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.बाबरवस्ती ची ही मराठी शाळा  जत तालुक्यातील पहिली द्विशिक्षकी आय. एस. ओ. मानांकन प्राप्त शाळा आहे.


  वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त  ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व पालकांचं आणि सहकार्य करणाऱ्या १०१ व्यक्तीचा ट्रॉफी आणि आभारपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात    विद्यार्थ्यांनी समाजप्रबोधनपर नाटिका,विविध गाणी,कविता तसेच विनोदी नाटिका  सादर करण्यात आली. 


    या कार्यक्रमास खास करून जिल्हा परिषद सदस्य   सरदार पाटील,माजी सभापती आर.के.पाटील,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आण्णासाहेब गडदे,प.स.उपसभापती विष्णु चव्हाण, मिरज येथील गोसलीया अध्यापक विद्यालयाचे अधिव्याख्याते उत्तम पांढरे,विकास माने,सुभाष पाटील,नामदेव पुजारी,मुल्ला सलिमाताई तुकाराम  कोरे,रामचंद्र राठोड उपस्थित होते.   


        जि.प.सदस्य सरदार पाटील म्हणाले, 
  *जी मदत लागेल ती मदत आम्ही करू.कोणतेही काम मागे राहू देणार नाही,*
 *स्पर्धेच्या  युगात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या  शिक्षकांनी  आपली  गुणवत्ता टिकवून ठेवली असून  स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे महत्वपूर्ण व्यासपीठ.*


      *आर.के पाटील सरांनी येथील शिक्षक वाघमारे सरांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला पाहिजे असे उदगार काढले.*
  *प्राध्यापक उत्तम पांढरे म्हणाले भविष्यात एखादा कलाकार निर्माण होण्यास मदत होईल उद्गार काढले ,*


 


*जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब गडदे यांनी शाळा व गाव व्यसनमुक्त केल्याबद्दल तसेच शिक्षणा बरोबर सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे आणि त्यातील सुप्तगुणांना वाव मिळाला पाहिजे असे  म्हणाले.*
  
     *उत्तम पांढरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्फत टी शर्ट दिले.*
    सर्व पालक,विद्यार्थी, पंचक्रोशीतील मुख्याध्यापक,शिक्षक, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिला.


    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कोळी,विशाल चिपडे,शाम राठोड यांनी केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी केले.तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन या शाळेचे शिक्षक अनिल पवार यांनी केले.




Popular posts
पांडोझरी येथे गरजू १०० कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप* (संख प्रतिनिधी-  मिलींद टोणे )
Image
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आज जत येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी ...
Image
बसवराज पाटील यांच्याकडून 500 जिवनावंश्यक किट व 5000 मास्क वाटप (संख प्रतीनिधी -- राजेभक्षर जमादार )
Image
कुणिकोणुर येथील सर्व गावकरी कुटुंबाना भाजीपाल्याचे वाटप*     अध्यात्माच्या माध्यमातुन समाजकार्य करणारे ह. भ. प. तुकारामबाबा महाराज* येळवी प्रतिनिधी (संजय चव्हाण)
Image
बंजारा समाजातील गोरगरीब मजुरांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप ... वसंतराव नाईक अधिकारी व कर्मचारी संघटना सांगली जिल्हा यांचा स्तुत्य उपक्रम .
Image