जत मध्ये शिवभोजन थाळीचा शुभारंभ...
जत : महाविकास आघाडीचा शिवभोजन थाळीचा शुभारंभ जत येथील बसस्थानक मधील उपहारग्रहात झाला. या शिवभोजन थाळीचा सर्व जतवासिय गोरगरिबांनी फक्त 5रु मध्ये आस्वाद घ्यावा .या शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्र कामगार सेना राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे, जत तालुका एस टी कामगार सेना अध्यक्ष यशवंत शिंदे, जत एस टी कॅन्टीन मालक सुरेश अंगडी व काही ग्राहक उपस्थित होते.