कुणिकोणुर येथे प्रधानमंत्री गरीब रेशन योजना मोफत धान्य वाटप व ग्रामपंचायतमार्फत सॅनिटायझरचे मोफत वाटप ..

कुणिकोणुर येथे प्रधानमंत्री गरीब रेशन योजना मोफत धान्य वाटप व ग्रामपंचायतमार्फत सॅनिटायझरचे मोफत वाटप ..


जत दर्शन न्युज... 
जत तालुक्यातील कुणिकोणुर येथे कोरोनाव्हायरसमुळे त्रस्त झालेल्या गरीब कुटुंबीयांना प्रधानमंत्री गरीब योजना व मोफत रेशनधान्य वाटप करण्यात आले. कुणिकोणुर येथे ग्रामपंचायत मार्फत सॅनिटायझर व अंत्योदय लाभार्थी व प्रधानमंत्री गरीब योजना या योजनेतून प्रत्येक व्यक्ती व कुटुंबियांना पाच किलो गहू व तांदूळ वाटप करण्यात आले .यावेळी  कुणिकोणुर गावचे लोकनियुक्त सरपंच लक्ष्मण पाटील म्हणाले की, सामाजिक भावनेतून गोरगरीब कुटुंबाला केंद्र व राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्य उपलब्ध करून दिले आहे याचा लाभ कुणिकोणुर ग्रामस्थांनी घ्यावा .घरी थांबून कोरोना या महाभयानक व्हायरसपासून आपला बचाव व्हावे यासाठी सर्व ग्रामस्थांनी साथ देणे गरजेचे आहे असे मत कुणिकोणुर गावचे सरपंच व उपसरपंच यांनी व्यक्त केले. यावेळी सरपंच लक्ष्मण पाटील ,उपसरपंच शशिकांत चव्हाण, आशा वर्कर, पोलीस पाटील तानाजी पाटील , स्वस्त धान्य दुकानदार शरद चव्हाण व जत दर्शन प्रतिनिधी संजय कांबळे सह कुणिकोणुर मधील ग्रामस्थ सोशल डिस्टन्स राखून उपस्थित होते.


Popular posts
कोरोनाचे संकट अद्यापही गडदच, नागरिकांनी स्वयंशिस्त न पाळल्यास मिळालेली शिथिलता रद्द* - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी मद्यविक्री दुकानासह ज्या आस्थापना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणार नाहीत त्या होणार बंद
Image
विजयनगर येथील रूग्णाच्या कुटूंबातील सर्वांचे अहवाल निगेटीव्ह* *सद्यस्थितीत जिल्ह्यात 26 रूग्ण कोरोनामुक्त* *इस्लामपूर येथील कोरोना बाधीत कुटूंबाशी संबंधित महिलेचा दुसरा अहवाल निगेटीव्ह*      - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
Image
पांडोझरी येथे गरजू १०० कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप* (संख प्रतिनिधी-  मिलींद टोणे )
Image
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आज जत येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी ...
Image
बसवराज पाटील यांच्याकडून 500 जिवनावंश्यक किट व 5000 मास्क वाटप (संख प्रतीनिधी -- राजेभक्षर जमादार )
Image