विजयनगर येथील रूग्णाच्या कुटूंबातील सर्वांचे अहवाल निगेटीव्ह* *सद्यस्थितीत जिल्ह्यात 26 रूग्ण कोरोनामुक्त* *इस्लामपूर येथील कोरोना बाधीत कुटूंबाशी संबंधित महिलेचा दुसरा अहवाल निगेटीव्ह*      - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

*विजयनगर येथील रूग्णाच्या कुटूंबातील सर्वांचे अहवाल निगेटीव्ह*


*सद्यस्थितीत जिल्ह्यात 26 रूग्ण कोरोनामुक्त*


*इस्लामपूर येथील कोरोना बाधीत कुटूंबाशी संबंधित महिलेचा दुसरा अहवाल निगेटीव्ह*
     - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : विजयनगर, सांगली येथील कोरोना बाधीत झालेल्या व काल मृत्यू पावलेल्या रूग्णाशी संबंधित एकूण 16 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यामध्ये  सदर रूग्णाच्या कुटुंबातील 5 व्यक्ती होत्या. यापैकी आई, वडील, भाऊ व पत्नी यांचे अहवाल सकाळीच प्राप्त झाले होते व ते निगेटीव्ह होते. रूग्णाच्या मुलाचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाला असून तो ही निगेटीव्ह आला आहे. सदर व्यक्तीशी संबंधित संपर्क बाधित अन्य 11 जण इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये होते त्यांचेही अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाले असून ते ही निगेटीव्ह आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
तर इस्लामपूर येथील कोरोना बाधीत कुटुंबाशी संबंधित महिला मिरज येथील आयसोलेशन कक्षात उपचार घेत होती. सदर महिलेचा दुसरा अहवालही निगेटीव्ह आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरानाची लागण झालेल्या 27 रूग्णांपैकी 26 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 
00000


Popular posts
कोरोनाचे संकट अद्यापही गडदच, नागरिकांनी स्वयंशिस्त न पाळल्यास मिळालेली शिथिलता रद्द* - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी मद्यविक्री दुकानासह ज्या आस्थापना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणार नाहीत त्या होणार बंद
Image
पांडोझरी येथे गरजू १०० कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप* (संख प्रतिनिधी-  मिलींद टोणे )
Image
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आज जत येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी ...
Image
बसवराज पाटील यांच्याकडून 500 जिवनावंश्यक किट व 5000 मास्क वाटप (संख प्रतीनिधी -- राजेभक्षर जमादार )
Image