संख ग्रामपंचायत यांच्याकडून 2000 मास्क व आशा वर्कर , अंगणवाडी सेविका तसेच ग्रामपंचायत कामगारांना प्रत्येकी एक हजार रुपये अनुदानाचे वाटप....
संख वार्ताहर - राजेभक्षर जमादार
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी व विषाणूपासून बचावासाठी जत तालुक्यातील संख येथे ग्रामपंचायतकडून 14 वित्त आयोगातून २ हजार मास्क आशा महिला वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कामगार,गरजू व गरीब यांना वाटप करण्यात आले. प्रोत्साहनपर अनुदान म्हणून प्रत्येकी एक हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.
संख ग्रामपंचायत मध्ये सरपंच सौ.मंगल पाटील,ग्राम विकास अधिकारी के.डी.नरळे यांच्या हस्ते 11आशा महिला,आशा गट प्रर्वतक 2 व 5 अंगणवाडी सेविका गावातील ,वाडी वस्तीवरील गरजू व गरीब शेतक-यांना मास्क वाटप केले. व कोरोना पासून मुक्त राहण्यासाठी जनजागृती करण्यात आली.
गावातील ११आशा सेविका, ५ अंगणवाडी सेविका, १० ग्रामपंचायत कामगार यांच्या प्रत्येकी खात्यामध्ये एक हजार रुपये अनुदान म्हणून देण्यात आले.
14 वित्त आयोग यामधून २हजार मास्क वाटप करण्यात आले. सर्व सेवा सोसायटी, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस चौकी, महावितरण कार्यालय, तहसीलदार ऑफिस अशा ठिकाणी मास्क वाटप करण्यात आले आहे
यावेळी उपस्थित लोकनियुक्ती सरपंच सौ मंगल पाटील ,ग्रामविकास अधिकारी के डी नरळे उपसरपंच सदाशिव दर्गाकर व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थितीत होते.