उमदी पोलिसांचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ पीडित कुटुंब व ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

उमदी पोलिसांचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
     पीडित कुटुंब व ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा


माडग्याळ/वार्ताहर:- (सचिन झेंडे) ता.जत येथे 8 मार्च रोजी कु. एकता विजय चंदनशिवे या मागासवर्गीय मुलगी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती परंतु अद्याप या प्रकरणाची पोलिसांकडून कोणतीच चौकशी न केल्याने तसेच पीडित कुटुंबातील सदस्यांनी वारंवार उमदी पोलीस ठाण्यास हेलपाटे मारूनही पोलिसांकडून फिर्याद दाखल करून घेण्यास  टाळटाळ करत असल्याचा व अर्थपूर्ण  घटना घडल्याचा संशय व आरोप पीडितीच्या कुटुंब यांनी केला आहे.
            मयत एकता ही आपल्या आजोळी आजी-आजोबांकडे राहत होती.8 मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान राहत्या घरी आत्महत्या करून घेतली होती.उमदी पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा करून तिचे शवविच्छेदन करून त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले.यावेळी मुलीचे काही साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले त्यामध्ये त्यांनी मुलगी वापरत असलेला आजीचा मोबाईल ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी कोणतीही चौकशी अथवा कारवाई केली नाही.पीडिताच्या कुटुंबीयाने दि. ११ मार्च  रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी जत यांना प्रत्यक्ष भेटून फिर्याद दाखल करून घेण्याचे तक्रार अर्ज केला.त्याचं दिवशी कुटुंब पोलीस ठाण्यात अर्ज देण्यात गेले असता उमदी पोलीस ठाणे कडून अर्ज स्वीकारला गेला नाही उलट कुटुंबियांना प्रश्नोत्तरांचा भडिमार केला.त्याच दिवशी उपविभागीय पोलिस अधिकारी जत हे उमदी येथे हजर होते. मुलीच्या आई-वडिलांना बोलावून घ्या मी तुमचा अर्ज स्वीकारून गुन्हा दाखल करतो असे उमदी पोलीस निरीक्षक यांनी सांगितले. परंतु यानंतर एकताचे कुटुंबीय तीन ते चार तास ताटकळत थांबले परंतु त्या दिवशी त्यांच्या अर्जावर कोणताच विचार केला नाही अथवा साधी फिर्याद ही दाखल करून घेतली नाही उलट तुम्ही उद्या  या  तुमचा जबाब उद्या घेतो असे सांगून पीडिताच्या कुटुंबीयांना घरी पाठवले.
               दुसऱ्या दिवशी काळजी 12 मार्च रोजी पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना माडग्याळ पोस्टला जबाबासाठी बोलावून घेतले व जबाबही घेतला. दुपारनंतर पिडितांच्या कुटुंबियांस येण्यास सांगितले .वरिष्ठ अधिकारी संध्याकाळी  माडग्याळ आउटपोस्ट येतो म्हणून सांगितले परंतु आले नाहीत .ते आले नसल्याने संध्याकाळी कुटुंबीयांना घेऊन  गुन्हा दाखल करण्यास उमदीला बोलावून घेतले. उमदी पोलिस ठाण्यात गेले असता कुटुंबियांची कोणतीही दखल घेतली गेली नाही उलट काही त्रुटी असून त्यामध्ये दुरुस्त करण्याचे त्यांच्या कर्मचाऱ्या सांगितले.शेवटी गुन्हा दाखल न करताच माघारी पाठवले.
        याबाबत तिच्या कुटुंबाचे म्हणणे असे आहे की, उमदी पोलिस ठाण्याचे अधिकारी फिर्याद घेण्यास टाळाटाळ करत आहेत. पीडितांच्या कुटुंबयांचे पोलीस स्टेशन उमदीला जाऊन व पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे मानसिक संतुलन बिघडून गेले आहे.याबाबत संशयित हे आम्हाला माहीत असून आमची मुलगी दगावली आहे गुन्हा दाखल करून घेतल्यास व संबंधित घटनेत जबाबदार असणाऱ्या आरोपींना  अटक न केल्यास आम्ही सर्व कुटुंबीय  याबाबत दाखल करून घेतल्यास व संबंधित घटनेत जबाबदार असणाऱ्या आरोपींना आरोपींना अटक न केल्यास आणि कुटुंब व समाज उपोषण   बसून माननीय जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक सांगली यांची भेट घेऊन रितसर अर्ज करणार असल्याचे सांगितले. 
         उपस्थित असलेले ग्रामस्थांनी रास्ता रोको ,कँडल मोर्चा अश्या विविध मार्गाने शांततापूर्ण लढाई न्याय मिळेपर्यंत लढणार असल्याचे सांगितले. पोलिसांनी पक्षपाती न करता पीडित मुलीला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती त्याच्या कुटुंबियांनी केली आहे.


चौकट:-उमदी पोलीस स्टेशनमध्ये तीन वेळा नातेवाईकाना बोलावून देखील संबधीताविरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही याचे गौडबंगाल काय अशी चर्चा माडग्याळ परिसरात चालू आहे.


Popular posts
बसवराज पाटील यांच्याकडून 500 जिवनावंश्यक किट व 5000 मास्क वाटप (संख प्रतीनिधी -- राजेभक्षर जमादार )
Image
कुणिकोणुर येथील सर्व गावकरी कुटुंबाना भाजीपाल्याचे वाटप*     अध्यात्माच्या माध्यमातुन समाजकार्य करणारे ह. भ. प. तुकारामबाबा महाराज* येळवी प्रतिनिधी (संजय चव्हाण)
Image
पांडोझरी येथे गरजू १०० कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप* (संख प्रतिनिधी-  मिलींद टोणे )
Image
बंजारा समाजातील मजुरांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप ... वसंतराव नाईक कर्मचारी संघटना सांगली जिल्हा यांचा स्तुत्य उपक्रम ...
Image
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आज जत येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी ...
Image