कामगार सेना व लायन्स क्लब जत तालुका यांच्या वतीने एस टी कामगारांना रुमाल वाटप...
सध्या जगभरात अतिभयंकर कोरोनो विषाणू ने मानवजातीवर महासंकट ओढवले आहे, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जत एस टी आगारात कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून महाराष्ट्र कामगार सेना व लायन्स क्लब जत यांच्या कडून एस टी तील अधिकारी वर्ग , चालक, वाहक, हेल्पर व काही प्रवासी असे सर्वांना मिळून दिडशे एक पांढरे शुभ्र रुमाल वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र कामगार सेना राज्य उपाध्यक्ष व लायन्स क्लब अध्यक्ष दिनकर पतंगे,लायन्स क्लब रिजनल चेअरमन राजेन्द्र आरळी, विभाग नियंत्रक ताम्हणकर मॅडम, आगारव्यवस्थापक विरेंद्र होनराव,आगारप्रमुख महेश जाधव, सेनेचे कामगार प्रतिनिधी पी. टी. मदने, क. बहिणाबाई चौधरी ट्रस्ट जत अध्यक्ष राजू सावंत,जत शहर युवासेना उपाध्यक्ष विक्रम पाचंगे, युवासेना कार्यकर्ते अमित शिंदे, मोसीन नदाफ,एस टी आगारातील विलासतात्या शिंदे, महेश पाटील, पोपट शिंदे, बळी यादव, प्रदीप खरात, दिलीप कोरे व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. अविनाश कोकरे सर जत आगार वाहतुक निरिक्षक यांनी सर्वांचे आभार मानले.