माडग्याळ येथील आत्महत्या प्रकरणी  दोघांवर गुन्हा दाखल

माडग्याळ येथील आत्महत्या प्रकरणी  दोघांवर गुन्हा दाखल


माडग्याळ /प्रतिनिधी :                 दि.8 /03/2020 रोजी माडग्याळ ता.जत येथील तरूणी एकता विजय चंदनशिवे हिने राहत्या घरी गळफास  आत्महत्या केली होती.  प्रकरणी दोघा बहिण भावाविरोधात उमदी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असुन , बबलू उर्फ दत्ता शंकर कलाल व बहिण अमृत्ता निलेश कलाल दोघे रा.माडग्याळ असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीची नावे आहेत. मयत एकताचा भाऊ राहूल राजू मलकनाथ रा.मुंबई यांनी फिर्याद दिली आहे. 
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,माडग्याळ येथे आजीकडे राहणारी एकता विजय चंदनशिवे हिचे संशयित बबलू उर्फ दत्ता शंकर कलाल यांच्यासोबत प्रेमसंबध होते. हे संबध बबलूची मावस बहिण अमृत्ता हिला मान्य नसल्याने , तिने एकताला तु आमच्या समाजाची नाहीस,त्यामुळे हे लग्न होणार नाही.तु माझ्या भावाबरोबरचे संबध तोड म्हणून तगादा लावला  होता.त्या दबावातून एकताने आत्महत्या केल्याचे एकताच्या भाऊ राहूल मलकनाथ यांने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे,जातीवाचक शब्द वापरणे आदी कलमाखाली गुन्हा दाखल केला असुन संशयित दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.अधिक तपास डिवायएसपी दिलीप जगदाळे करत आहेत.या प्रकरणात माडग्याळ येथील पिडीत कूटूबांला न्याय मिळवून देण्यासाठी आणि फिर्याद नोंद करण्यासाठी  उमदी पोलिस ठाण्यात जाऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुका तालुका अध्यक्ष तथा नॅशनल दलित मूंहमेंट फाॅर जस्टिस चे जिल्हा सरचिटणीस श्रीकांत हूवाळे सर, जत नगरसेवक भूपेंद्र कांबळे साहेब .जिल्हा उपाध्यक्ष संजय देवंनाळकर, राकेश कांबळे, उपाध्यक्ष मूत्यापा कांबळे,सजंय कांबळे सूसलादकर,निरीक्षक भीमाशंकर कांबळे,सागर तोरणे,अरूण कट्टिमनी,उपाध्यक्ष मल्लिकार्जुन कांबळे,प्रकाश कांबळे,माडग्याळचे माजी सरपंच सूरेश ऐवाळे,दिलिप कांबळे, तसेच माडग्याळ येथील कार्यकर्ते,यानी  उमदी पोलिस ठाण्यात हजर राहून आरोपींना अटक करण्यास सांगितले, लगेच पोलीसांनी आरोपींना अटक केली.त्यानतंर तेच शिष्टमंडळ जत येथे जाऊन डि वाय एस पी जत तालुका यांना भेटून निवेदन दिले,


Popular posts
बसवराज पाटील यांच्याकडून 500 जिवनावंश्यक किट व 5000 मास्क वाटप (संख प्रतीनिधी -- राजेभक्षर जमादार )
Image
कुणिकोणुर येथील सर्व गावकरी कुटुंबाना भाजीपाल्याचे वाटप*     अध्यात्माच्या माध्यमातुन समाजकार्य करणारे ह. भ. प. तुकारामबाबा महाराज* येळवी प्रतिनिधी (संजय चव्हाण)
Image
पांडोझरी येथे गरजू १०० कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप* (संख प्रतिनिधी-  मिलींद टोणे )
Image
बंजारा समाजातील मजुरांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप ... वसंतराव नाईक कर्मचारी संघटना सांगली जिल्हा यांचा स्तुत्य उपक्रम ...
Image
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आज जत येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी ...
Image