पोलीस पथकावर जमावाकडून हल्ला ; चार जणाविरोधात गुन्हा दाखल

पोलीस पथकावर जमावाकडून हल्ला ; चार जणाविरोधात गुन्हा दाखल
-----------------------------------
माडग्याळ/प्रतिनिधी : (सचिन झेंडेे) निगडी बुद्रुक येथील लमाणतांडा (ता.जत)येथे दोन गटातील हाणामारी नियंत्रीत करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचा-यांच्यावर जमावाने दगडफेक केल्याने एका महिला कर्मचाऱ्यासह तिघे पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी 7 च्या दरम्यान घडली.याप्रकरणी उमदी पोलीसांनी चार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


याबाबत उमदी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि,निगडी बुद्रूक येथिल लमाणतांडा येथे बुधवारी संध्याकाळी महिलांच्या छेडछाडीवरून दोन गटात हाणामारीची घटना घडत असल्याची बातमी निगडी बु.चे पोलीस पाटील यांनी उमदी पोलिस ठाणेस माहिती दिली.माहिती मिळताच  उपनिरीक्षक श्री.दांडगे,स्ट्राइकिंग फोर्ससह घटनास्थळी पोहोचले.घटनास्थळी दोन गट भिडले होते.त्यांना पांगवण्याचा प्रयत्न पोलीस करीत असताना त्यांनी पोलिसांवर दगड फेक करण्यास सुरुवात केली.या दगडफेकीमध्ये उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संभाजी करांडे,पो.काॅ. दिपक योचीवले,महिला पोलीस शिपाई सुनीता कांबळे यांना डोके व पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत.याप्रंसगी उमदी पोलिसांनी चार अज्ञात आरोपींच्या विरोधात बेकायदा जमाव करणे,शासकीय कामात अडथळा,पोलीसावर हल्ला करणे,आदी कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.संशयित अरोपीचा शोध सुरू आहे.अधिक तपास सपोनी दत्तात्रय कोळेकर व पोलिस उपनिरीक्षक दांडगे हे करीत आहेत.


Popular posts
कोरोनाचे संकट अद्यापही गडदच, नागरिकांनी स्वयंशिस्त न पाळल्यास मिळालेली शिथिलता रद्द* - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी मद्यविक्री दुकानासह ज्या आस्थापना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणार नाहीत त्या होणार बंद
Image
विजयनगर येथील रूग्णाच्या कुटूंबातील सर्वांचे अहवाल निगेटीव्ह* *सद्यस्थितीत जिल्ह्यात 26 रूग्ण कोरोनामुक्त* *इस्लामपूर येथील कोरोना बाधीत कुटूंबाशी संबंधित महिलेचा दुसरा अहवाल निगेटीव्ह*      - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
Image
पांडोझरी येथे गरजू १०० कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप* (संख प्रतिनिधी-  मिलींद टोणे )
Image
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आज जत येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी ...
Image
बसवराज पाटील यांच्याकडून 500 जिवनावंश्यक किट व 5000 मास्क वाटप (संख प्रतीनिधी -- राजेभक्षर जमादार )
Image