माडग्याळ ता.जत येथे सापडला संशयित कोरोना रुग्ण , उपचारासाठी केले तातडीने सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल
प्रतिनिधी: माडग्याळ
माडग्याळ तालुका जत येथे संशयित कोरोना रुग्ण सापडला असुन या संशयित रुग्णांस सांगली येथे शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. जत तालुक्यातील , माडग्याळ जवळ लकडेवाडी येथील व्यक्ती सर्दी ,खोकला, ताप , छाती भरणे, व ताप आल्याने माडग्याळ येथे खाजगी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी आला होता. त्यावेळी या व्यक्ती च्या आजारपणाचे लक्षण कोरोणा वायरस चे असल्याचे संशयावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. सर्कल पी एस बुचडे , तलाठी उदगिरे , येळवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुपरवायझर परीट एस बी, पोलीस हवालादार बन्नेनवर यांच्या पथकाने रुग्णास ताब्यात घेऊन सांगली येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.
तत्पूर्वी हा रुग्ण पुणे येथून आला होता. व वरील त्रास जाणवल्याने रुग्णालयात दाखल झाला होता. डॉक्टरांनी पेशंट पुण्याहून आल्याने रिस्क नको म्हणून प्रशासनास कळविले.प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पेशंटला मिरज येथे सिव्हिल हॉस्पिटलकडे उपचारासाठी रवाना करण्यात आले. कोरोणा संशयित सापडल्याने माडग्याळ व लकडेवाडी परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून प्रशासन यावर दक्ष आहे, व खबरदारी घेऊन काम पाहत आहे.
माडग्याळ ता.जत येथे सापडला संशयित कोरोना रुग्ण , उपचारासाठी केले तातडीने सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल