कुणीकोणूरमध्ये पहिल्या दिवशी लाँकडाऊनला शंभर टक्के प्रतिसाद...
22 एप्रिल ते 26 एप्रिल या कालावधीत ग्रामस्थांनी लाँकडाऊन राहून सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
जत दर्शन प्रतिनिधी( अनिल राठोड व संजय चव्हाण)
जत तालुक्यातील कुणीकोणूर गावामध्ये कोरोनासारख्या महामारीपासून बचाव होण्यासाठी दिनांक 22 एप्रिल ते 26 एप्रिल या कालावधीमध्ये 100% लॉकडाऊन पाळण्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने आवाहन करण्यात आले होते . या आव्हानाला कुणिकोणुर ग्रामस्थांनी पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. पुढील चार दिवसांमध्ये ही अशा पद्धतीने प्रतिसाद मिळावा हीच अपेक्षा कुणिकोणुर गावचे लोकनियुक्त सरपंच लक्ष्मण पाटील , उपसरपंच शशिकांत चव्हाण व पोलीस पाटील तानाजी पाटील त्याचबरोबर आरोग्य कर्मचारी व पत्रकार बांधवांनी व्यक्त केली आहे. गावातील सर्वांनी या कोरोना सारख्या संकटाला घाबरून न जाता लॉकडाऊनच्या नियमाचे पालन करावे असे आव्हान ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आले आहे.